श्री. अविनाश निंबाळकर

Shri. Avinash Nimbalkar

श्री. अविनाश निंबाळकर

संचालक (प्रकल्प) (प्रभारी)

अविनाश निंबाळकर यांना संचालक (प्रकल्प) महापारेषण पदाचा कार्यभार दि. २१.०२.२०२४ पासून सोपवण्यात आला आहे. श्री. निंबाळकर यांनी १९९० मध्ये नागपूर विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. सीओईपी, पुणे येथून एमई (डिजिटल सिस्टीम) करून ते संशोधन आणि विकास अभियंता म्हणून कॉन्सेप्ट इंटिग्रेशन, पुणे येथे रूजू झाले. त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली येथून एमबीए (फायनान्स) केले आहे. ते सध्या आयआयएम, नागपूर येथून प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन देखील करीत आहेत.

ते १९९४ मध्ये पूर्वीच्या मराविमं (MSEB) मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाले. त्यानंतर २००६ मध्ये त्यांची थेट भरतीव्दारे कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. त्यांनी २००६ ते २०१४ पर्यंत एच.व्ही.डी.सी. चंद्रपूरमध्ये काम केले. त्यांना २०१४ मध्ये अधीक्षक अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांनी सांघिक कार्यालय, मुंबई येथे अधीक्षक अभियंता (प्रशिक्षण) म्हणून काम केले. त्यावेळी त्यांनी अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी विविध आयआयटी व आयआयएमसोबत करार केले.

त्यानंतर २०१५ ते २०२२ या कालावधीत त्यांची नागपूर प्रकल्प मंडळात नियुक्ती झाली. त्यांची २०२२ मध्ये थेट भरतीमध्ये मुख्य अभियंता म्हणून निवड झाली. डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर परिमंडळामध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यांना नवीन अउदा उपकेंद्र व पारेषण वाहिनी नियोजन व बांधकामामधील २२ वर्षांचा अनुभव आहे. महापारेषणमधील विविध नवीन प्रकल्पांची अंमलबजावणी आणि विविध नवीन उपकेंद्र २२० के. व्ही. परभणी, १३२ के. व्ही. नागपूर, ४०० के. व्ही. कोराडी-२, ४०० के. व्ही. चंद्रपूर-२, ४०० के. व्ही. कोराडी-वर्धा, ४०० के. व्ही. चंद्रपूर-वरोरा आणि अन्य २२० के. व्ही. १३२ के. व्ही. उपकेंद्र व वाहिनींचे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यान्वित झाल्या.

This page was last updated on 06 Mar 2024