सतीश चव्हाण

श्री. सतीश चव्हाण
संचालक (संचलन)
सतीश चव्हाण हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथून विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत.
सुमारे ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पारेषण आणि वितरण विभागामध्ये स्टील आणि ऊर्जा क्षेत्रात शिकाऊ अभियंता ते संचालक, बोर्ड सदस्य अशा विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी १२ वर्षे महावितरणमध्ये अधीक्षक अभियंता ते संचालक (वाणिज्य) अशा पदांवर भार व्यवस्थापन, वीज खरेदी, नियामक आणि वाणिज्य विभाग, ऊर्जा संक्रमण व्यवस्थापन, संचलन आणि देखभाल विभागामध्ये उत्कृष्ट काम केले आहे.
यापूर्वी त्यांनी महापारेषणच्या अउदा बांधकाम विभागामध्ये उपकार्यकारी अभियंता या पदावर सात वर्षे काम केले आहे. तसेच भारताबरोबरच परदेशातील विविध स्टील प्रकल्पांमध्ये प्रकल्प आणि देखभाल विभागामध्ये काम केल्याचा मोठा अनुभव आहे. त्यांना ऊर्जा क्षेत्रातील अभियांत्रिकी, वाणिज्य, अर्थशास्त्र आणि कायद्यांशी संबंधित विषयी प्रदीर्घ अनुभव आहे.