सुगत गमरे

श्री.सुगत गमरे
संचालक
(मानव संसाधन)
श्री. सुगत गमरे यांची महापारेषणचे संचालक, मानव संसाधन पदावर दि.१०.०१.२०२२ पासून नियुक्ती करण्यात आली आहे. संचालक, (मानव संसाधन) पदावर नियुक्ती होण्याआधी ते दि. ०३.०८.२०१६ पासून मुख्य महाव्यवस्थापक, (मानव संसाधन) पदावर कार्यरत होते. त्यांनी दि. ०३.०१.२०१८ पासून कार्यकारी संचालक (मानव संसाधन) पदाचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता.
श्री. गमरे यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) मधून वर्ष १९९६ साली कार्मिक व्यवस्थापन व औद्योगिक संबंध या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती आणि त्यांनी २५ वर्षांचा अनुभव प्राप्त केला आहे. महापारेषणमध्ये येण्याआधी त्यांनी मुकुंद लि., मुंबई विद्यापीठ, नॅशनल बँक ऑफ अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड), विदेश संचार निगम लिमिटेड (व्हीएसएनएल) आणि घर्डा केमिकल्स येथे काम केले. श्री. गमरे यांना मानव संसाधन धोरण आखणे, प्रशासन, शिक्षण व विकास, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट अँड चेंज मॅनेजमेंट (ओडीसीएम) व व्यवस्थापनातील प्रदीर्घ अनुभव आहे. श्री. गमरे यांना त्यांच्या नवीन भूमिकेकरिता व जबाबदारीकरिता खूप-खूप शुभेच्छा!