Trupti Nitin Mudholkar

श्रीमती तृप्ती नितीन मुधोळकर
संचालक (वित्त)
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) संचालक (वित्त) पदाचा कार्यभार श्रीमती तृप्ती नितीन मुधोळकर यांनी शुक्रवारी (दि. १९.०७.२०२४) घेतला. संचालक (वित्त) या पदावर विराजमान होणाऱ्या त्या महापारेषणच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
यापूर्वी त्यांनी महानिर्मिती कंपनीच्या मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) म्हणून मुख्यालय, मुंबई येथे काम पाहिले होते.
चार्टर्ड अकाऊंटंट पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या ऑगस्ट १९९६ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात ४०० के. व्ही. विभागीय कार्यालय, नागपूर येथे व्यवस्थापक (वित्त व लेखा) म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर महानिर्मितीच्या स्थापत्य विभाग खापरखेडा, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, अंतर्गत लेखा विभाग नागपूर, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र, बांधकाम विभाग कोराडी आणि मुख्यालय मुंबई इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले आहे. व्यवस्थापक (वित्त व लेखा) ते मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अशा विविध महत्वपूर्ण पदांवर त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला होता.
महानिर्मितीमध्ये त्यांना स्थापत्य, प्रकल्प, संचलन व सुव्यवस्था, अंतर्गत लेखा परीक्षण, कॉर्पोरेट अकाऊंटसचा मोठा अनुभव आहे. तसेच महापारेषण कंपनीत "वित्तीय तज्ज्ञ" म्हणून त्या संचालकपदी कार्यरत होत्या. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी महानिर्मितीच्या सेवेतून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या.