दिनेश वाघमारे

Arvind_Singh1
दिनेश वाघमारे
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

श्री. दिनेश वाघमारे (आय.ए.एस.) हे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून दि. २३.०१.२०२० रोजी रुजू झाले आहेत. ते १९९४ च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी श्री. पराग जैन नानोटिया (आय.ए.एस) यांच्याकडून नुकताच पदभार घेतला आहे. श्री. पराग जैन नानोटिया (आय.ए.एस.) यांची सचिव, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन येथे नियुक्ती झाली आहे. महापारेषणमध्ये रुजू होण्यापूर्वी श्री. वाघमारे हे प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन म्हणून कार्यरत होते.


श्री. वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील २६ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीएनआयटी) केले आहे. ते आय.आय.टी. खरगपूरचे एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) इंजिनिअर आहेत. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एम.एस्सी. केले आहे. त्यांना संघबांधणी, प्रकल्प नेतृत्व, प्रशासन आणि व्यवस्थापन यांचा मोठा अनुभव आहे.

 

 

 

 

This page was last updated on 20 Jan 2021