संजीव कुमार

डॉ. संजीव कुमार
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
श्री. डॉ. संजीव कुमार (आय.ए.एस) हे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून दि. ०३.०५.२०२३ रोजी रुजू झाले आहेत. ते २००३ च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. महापारेषण मध्ये रुजू होण्यापूर्वी श्री. डॉ. संजीव कुमार हे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट शासन म्हणून कार्यरत होते.
श्री. डॉ. संजीव कुमार हे जम्मू वैद्यकीय महाविद्यालयाचे पदवीधर आहेत. त्यांनी लंडनच्या किंग्ज महाविद्यालयातून सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील २० वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांना संघबांधणी, प्रकल्प नेतृत्व, प्रशासन आणि व्यवस्थापन यांचा मोठा अनुभव आहे.
This page was last updated on 03 Nov 2023